Tuljapur Temple administration decision due to messy situation 
Tuljapur Temple administration decision due to messy situation  
मराठवाडा

तुळजापूर : मंदिरातील गोंधळाने मंदिर प्रशासनाचा 'हा' निर्णय

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर : तुळजा भवानी मातेच्या चैत्री यात्रेस गुरूवारी तारीख 18 मध्यरात्री गर्दी होऊन चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने मंदीरातील गोमुख तिर्थ आणि कल्लोळ तिर्थ प्रशासनाने भाविकांना अंघोळीसाठी बंद करण्याचा निर्णय मंदीर समितीने घेतला. सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. 

तुळजाभवानी मंदीरात गुरूवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मंदीर बंद झाल्याने भाविक बाहेर काढण्यात आले. तेच भाविक पुन्हा मंदीर रात्री एक वाजण्याच्या सुमारास उघडणार असल्याने महाद्वारातून मंदिरात कल्लोळ तिर्थ, गायमुख तिर्थ कुंड या भागात आले. गायमुख तिर्थ आणि कल्लोळ तिर्थ या भागात प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस आणि मंदीर प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण आणले. तसेच गायमुख तिर्थ आणि कल्लोळ तिर्थ कुंड प्रशासनाने पूर्णपणे बंद केले. तुळजा भवानी मंदीरात चैत्र पौर्णिमेच्या मध्यरात्री गर्दी अचानक वाढेल याचा प्रशासनास अंदाज आला नाही. त्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. कोणतेही अनुचित प्रकार घडला नाही. प्रशासनाने काळजी घेतली. 

तुळजाभवानी मंदीरात गुरूवारी रात्री मंदीर बंद झाल्या नंतर बाहेर आलेले यात्रेकरू गायमुख तिर्थ आणि कल्लोळ तिर्थ या भागात आले. त्यामुळे तेथे असणारे पाणी आणि दलदल निर्माण होऊन चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून गौमुख आणि कल्लोळ तिर्थ कुंड बंद केले. - एन.जी. झांपलवाड, तुळजा भवानी मंदीर समितीचे सरव्यवस्थापक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT